अचलपूर । साक्षीदार न्युज । दि, 3जानेवारी 2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने अचलपूर शहरातील बिलनपुरा दुल्हा गेट परकोट येथील नागरिकांचे घरकुल करण्यासाठी मुख्याधिकारी अचलपूर यांना निवेदन देण्यात आले या निवेदणाद्वारे आर पी आय चे शहराध्यक्ष किशोर मोहोड यांनी प्रशासनाला पाच फेब्रुवारी 2025 पर्यंत घरकुल मंजुरीची कार्यवाही पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे अन्यथा जण आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले..
या निवेदनात त्यांनी सांगितले आहे कि , बिलनपुरा दुल्हगेट येथील नागरिक मागील काही वर्षापासून घरकुल साठी निवेदन देत आहेत मागील वर्षी 2024 मध्ये आंदोलन करण्यात येत होते परंतु आचासंहिता लागल्यामुळे हे आंदोलन रोखण्यात आले होते घरकुलमुळे अनेक कुटुंबं अत्यंत हलाखिच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत त्यांना मूलभूत हक्क म्हणून घरकुल उपलब्ध होणे आवश्यक आहे तरीही अध्याप त्यांची प्रकरणे प्रलंबीत असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे आर पी आय चे शहरांध्यक्ष किशोर मोहोड यांच्या नेतृत्वा खाली हे निवेदन सादर करण्यात आले या वेळी बिलनपुरा दुल्हागेट परकोट भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनात नमूद करण्यात आले कि घरकुल मंजुरीसाठी शासनाने वेगाने कार्यवाही करावी जर पाच फेब्रुवारी 2025 पर्यंत ही समस्या सुटली नाही तर आम्हाला मजबूर होऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागेल आर पी आय च्या मागण्या बिलनपुरा दुल्हागेट येथील गरीब कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करावे बऱ्याच वर्षापासून शासकीय जागेवर वास्तव्य करणाऱ्यांना पी आर कार्ड देण्यात यावे शासनाच्या विविध योजनेचा लाभार्थ्यांना त्वरित लाभ द्यावा एकूण अकरा मागण्या केल्या असून नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि समस्याकडे अधिक गंभीर्याने लक्ष द्यावे .
नागरिकांनी या निवेदनाला जोरदार पाठींबा दर्शवला अनेकांनी आपल्या व्यथा मांडत घरकुल मंजुरीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्या जीवनात निर्माण झालेली अस्थिरता त्यांनी अंघोरेखित केली.पक्षाने प्रशासनाला इशारा दिला आहे कि जर 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत घरकुल मंजुरीची कार्यवाही व इतर अकरा मागण्याची पूर्तता झाली नाही तर संपूर्ण अचलपूर शहरांत मोठा जनआक्रोश मोर्चा नगरपरिषद कार्यालय कॅम्प येथे काढण्यात येईल या वेळी त्या भागातील अनेक नागरिक उपस्थित होते या निवेदना नंतर अचलपूर प्रशासनावर लोकांच्या मागणीची पूर्तता करण्याचा दवाब निर्माण झाला आहे या कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना किशोर मोहोड. वर्षाताई तायडे सुनील तायडे सुनील थोरात. प्रभा बाई वानखडे प्रणिता तायडे सरोज वानखडे विमल वाकोडे उज्वला इंगोले नंदा रूपनारायण नरेंद्र वानखडे नवीन वाटणे प्रमिला इंगोले सचिन वाकोडे ज्योती पोटे उज्वला मोहने मंदा भटकर सुगंधा भिसे अस्मिता इंगळे असे शेकडो महिला पुरुष निवेदन देते वेळी उपस्थित होते
बिग ब्रेकिंग ; – पाळधी गावात गाडीचा हॉर्न आणि तणाव / जाळपोळ / तोडफोड
माझ्या रोजीरोटीचे नुकसान केले हो साहेब