सणासुदीच्या तोंडावर फुल उत्पादक शेतकरी संकटात !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | सध्या देशभरात अनेक सण येत्या काही दिवसावर येवून ठेपले आहे. या सणात मोठ्या प्रमाणात फुलांची विक्री होत असते, त्याचमाध्यमातून अनेक शेतकऱ्यांना मोठा फायदा देखील होत असतो पण यंदा दिवाळी फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

राज्यात कमी पाऊस पडल्याने व धुई पडल्याने झेंडू फुल उत्पादक शेतकऱ्यांवर संक्रात आली आहे. कमी पाऊस पडल्याने व धुई पडल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात तर घट तर झालीच आहे. मात्र, झेंडू फुलांवर देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडू उत्पादनासाठी लावलेल्या खर्च देखील यावर्षी न निघण्याचे चिन्हे दिसत आहेत. दसरा दोन दिवसांवर येवून ठेपला असूनही रोगाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेल्या झेंडू फुलाला व्यापारी विकत घेण्यास तयार नाही.

बुलढाण्यापासून काही अंतरावर असलेले नांद्राकोळी येथील शेतकरी बालु भिवसन हुडेकर हे दरवर्षी आपल्या शेतात सणासुदीच्या वेळेस झेंडू फुलांची शेती करीत असतात. मागील वर्षी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडून थेट शेतातून त्यांच्याकडून 35 ते 40 रुपये किलोप्रमाणे झेंडू फुलांची खरेदी केली होती. मात्र, यावर्षी त्यांच्या शेतातील झेंडू फुलावर कमी पाऊस पडल्याने व धुई पडल्याने रोग पडला आहे. यामुळे यावर्षी त्यांचा उत्पादन खर्च देखील निघेल की नाही? याची त्यांना शास्वती नाही. म्हणून अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS