
साक्षीदार न्युज । गेल्या 4 वर्षांपासून समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असणारी संस्था म्हणजे एल जी आर फाउंडेशन, एखाद्या वंचित व्यक्तीला कपड्यांचे जोड देणे म्हणजे त्याला स्वाभिमानाने कपडे घालण्याइतके चांगले आहे. या उद्देशाने आमची एल जी आर फाउंडेशनची टिम समाजातील सर्व वयोगटातील गरीब मुले, महिला आणि पुरुषांना वापरण्यायोग्य कपडे आणि वस्त्रे वितरित करते. अधिकाधिक गरीब आणि गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आम्ही विविध संस्थांच्या नेटवर्कद्वारे संपर्क साधून भविष्यात महाराष्ट्रभर गरिबांना कपडे वितरित करण्याबाबत उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत यात नागरिकांचे सहकार्य लाभले अशी अपेक्षा करू .

याचाच एक भाग म्हणून व सुरुवात म्हणून गेल्या दोन वर्षापासून कपड्याचे वाटप करणारे आमचे संस्था यावर्षी देखील दर सालाबदाप्रमाणे फाउंडेशनचे अध्यक्ष रवि नेटके यांनी जळगाव शहरातील उघड्यावर असलेले गोरगरीब ज्यांना अंगावर वस्त्र नाही अशा व्यक्तींना विशेष लक्ष देऊन त्यांना घरातील जुने उबदार व शर्ट पॅन्ट महिलांना साडी हे कपडे देऊन त्यांचा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जातो यात लिंगानुसार महिला पुरुष लहान मुले याप्रमाणे कपड्याचे वाटप करण्यात येत असते, हाच उद्देश साधून मकर संक्रांति निमित्त या कपड्यांचे वाटप लोकहित गुरु रविदास फाउंडेशनचे अध्यक्ष रवी नेटके व त्यांच्या टीमने केले शहरातील रेल्वे स्थानक जिल्हा सामान्य रुग्णालय व विविध ठिकाणी फूटपाटवर बसलेले भिकारी, मजुरी करणारे रस्त्यावरील कुटुंब ज्यांच्या अंगावर कपडे नसलेल्यांना कपडे देण्याचा उपक्रम हाती घेतला .









