back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Uddhav Thackeray Birthday ; उध्दव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्ताने कुलभूषण पाटील वाटणार १० हजार छत्री व टीशर्ट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

- Advertisement -

Uddhav Thackeray Birthday जळगाव (साक्षीदार न्युज ) ; – उबाठा गटाचे उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) छत्री व टी शर्टचे आज शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर अनावरण करण्यात आले. पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करत कुलभुषण पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले. यावेळी त्यांनी जळगाव शहरात काम करत रहा, अशा सुचना देत राजकीय वाटचालीसाठी आर्शिवाद दिले.

उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उबाठा गटाचे माजी उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्या तर्फे जळगाव शहरात १० हजार छत्री व टी शर्टचे वाटप करण्यात येणार आहे. या छत्री व टी शर्टचे आज उध्दव ठाकरे यांनी कौतूक केले. छत्री व टी शर्टवर बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, अदित्य ठाकरे व कुलभुषण पाटील यांचा फोटो व मशालीचे चिन्ह आहे. या माध्यतातून पक्षाचे नाव व चिन्ह घराघरात पोहचिण्यास मदत होईल. यावेळी बाळासाहेबांची २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण ही शिकवण लक्षात ठेवून सामाजिक काम करत रहा. नागरिकांच्या मनात मशालच आहे, याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत आलीच आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत यश आपलेच आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी कुलभुषण पाटील यांचे कौतूक केले. यावेळी सुनिल ठाकूर उपस्थित होते.

- Advertisement -

कुलभूषण पाटील हे जळगाव शहरातील शिवसेनेचा तरुण आक्रमक चेहरा असून विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेचे काम करत आहेत. उपमहापौर असतांना केलेल्या कामामुळे त्यांची शहरात चांगली ओळख निर्माण झाली आहे. पिंप्राळा उपनगरात त्यांनी रस्ते व इतर मूलभूत सुविधांचे जाळे विणले आहे. पिंप्राळातील त्यांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्यावेळी देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले होते. यामुळे आगामी विधानसभेनिमित्त त्यांचे पारडे जड असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

Uddhav Thackeray Birthday

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS