back to top
शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025

मध्यरात्री महामार्गावर भीषण अपघातात एक ठार तर दोन जखमी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १८ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील महामार्गावर गेल्या काही वर्षापासून अपघाताच्या घटना नियमित घडत असतांना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव- चांदवड राज्य मार्गावरील हिंगोणे गावानजीक वळणावर चारचाकी गाडी उलटल्याने एक जागीच ठार, तर तीनजण जखमी झाले. हे वळण धोकादायक बनले असून या ठिकाणी अपघाताची मालिका सुरूच आहे. या अपघातात मृताचे नाव अरुण मोरे (४५, रा. घोगरगाव, ता. जामखेड) असे असून जखमी संदेश सुनील कोठारी (३९), रसिकलाल मोहनलाल बोथरा (४५), सुजित सुनील अवसरकर (३७, तिघे रा. (जामखेड) यांच्यावर चाळीसगावला खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीनंतर जामखेड, ता.जामखेड येथील रहिवासी चारचाकी गाडीने क्रमांक एम.एच. १६ सी.व्ही. २२७७ जळगाव येथून जामखेड येथे जात होते. दरम्यान, हिंगोणे (ता. चाळीसगाव ) जवळील वळणावर अचानक आलेल्या खराब रस्त्यामुळे चालकाचा ताबा सुटल्याने गाडी उलटून झाडावर आदळली. गाडी झाडात अडकल्याने प्रवाशांना बाहेर काढता येत नव्हते. दरम्यान, खासदार उन्मेष पाटील चाळीसगावकडे जात असताना ते घटनास्थळी थांबले. तत्काळ चाळीसगाव येथून रुग्णवाहिका व कटर मागविले. गाडी कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढले. चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर यात अरुण मोरे (४५) रा. घोगरगाव, ता. जामखेड यांचा मृत्यू झाला.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Charmkar Vikas Sangh | चर्मकार विकास संघाच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा...

Charmkar Vikas Sangh | साक्षीदार न्यूज | जळगाव येथील चर्मकार विकास संघ आणि गुरु रविदास क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जुलै 2025 रोजी गुणवंत...

Foreign Tours | सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांचे नवीन नियम...

Foreign Tours | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर कडक निर्बंध घातले आहेत. आता या दौऱ्यांचा राज्य सरकारला नेमका काय फायदा...

Meera Borwankar | राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव, 7/11 बॉम्बस्फोट आणि...

Meera Borwankar | साक्षीदार न्यूज | माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी मालेगाव बॉम्बस्फोट, 7/11 ट्रेन बॉम्बस्फोट आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील पीडितांना...

RECENT NEWS