साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ जळगाव शहरालगत असलेल्या छोट्या मोठ्या रस्त्यावर नेहमीच अपघाताची मालिका सुरु असतांना ग्रामीण भागातील विदगावहून जळगावकडे येत असलेल्या दुचाकीस्वाराला समोरून आलेल्या रीक्षाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ममुराबादजळील पेट्रोलपंपासमोर झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात रीक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विजय पंडीत कोळी (46, रा.चौघुले प्लॉट, शनीपेठ, जळगाव) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदगावहून जळगावकडे विजय कोळी हे दुचाकी (एम.एच.19 ए.वाय.7905) ने येत असताना रीक्षा (एम.एच.19 व्ही.3642) ने ममुराबादजवळील फार्मसी कॉलेजवळील पेट्रोलपंपासमोर दुचाकीला समोरून जबर धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार विजय कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक माणिक सपकाळे व हवालदार विलास शिंदे यांनी धाव घेतली. कोळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, पुतणे असा परीवार आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात विनोद पंडित कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रीक्षा (एम.एच.19 व्ही.3642) वरील चालकाविरोधात अपघाताचा व दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या अपघातात रीक्षासह दुचाकीचे नुकसान झाले तर रीक्षा चालकदेखील जखमी झाला. तपास हवालदार सुधाकर शिंदे करीत आहेत.