विहार खोदतांना ब्लास्टिंगच्या स्फोटात एक जण ठार तर …

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज । जामनेर तालुक्यातील अंबील होळ डवरी येथे विहिरीचे काम सुरू असताना आज मोठा अपघात घडला. कामादरम्यान झालेल्या ब्लास्टिंगच्या स्फोटात राहुल वाघ (रा. मुंदखेडा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर भूपेश चव्हाण (रा. अंबील होळ) हे गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी भूपेश चव्हाण यांना तातडीने जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांना धीर दिला तसेच जखमीच्या तातडीच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. विहिरीच्या कामासाठी घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisement -

या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS