One Sided Love Young Woman ; एकतर्फी प्रेम : भररस्त्यात तरुणीच्या बहिणीला मारहाण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक शहरात प्रेमप्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच कल्याण शहरात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार घडला असून भर रस्त्यात तरुणीला अडवून तुझ्या बहिणीला माझ्याशी लग्न करायला सांग; असे धमकावुन मारहाण केली. इतकेच नाही तर तिचा मोबाईल हिसकावून पळून गेल्याची घटना घडली आहे. या तरुणाला कोळशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेत भागात भररस्त्यावर संशयित आरोपी हेमंत गमरे याचे एका तरुणीवर एकतर्फी प्रेम असून या प्रेमातून त्याने तरुणीच्या बहिणीचा पाठलाग करत जवळ पोहचत रास्ता अडविला. यानंतर तुझ्या बहिणीवर प्रेम करतो. ती माझ्याशी बोलत नाही. तिला सांग माझ्याशी लग्न करायला अशी धमकी दिली. हे ऐकून ही तरुणी घाबरली व ती पुढे चालू लागली. संतापलेल्या या तरुणाने त्या तरुणीला पकडून तुझ्या बहिणीला माझ्याशी लग्न करायला सांग अशी धमकी देत भर रस्त्यात मारहाण केली व त्या तरुणीचा मोबाईल हिसकावून तो तरुण पळून गेला.

घटनेची माहिती तरुणीने आणि स्थानिकांनी पोलीसांना दिली. पोलिस अधिकारी हेमंत ढोले यांनी या प्रकरणाची माहिती मिळाली. कोळसेवाडी पेालिस ठाण्याच्या डिटेक्शन स्टाफमधील पोलिस त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. या दरम्यान एक संशयित तरुण पळताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव हेमंत गमरे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

One Sided Love Young Woman

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS