back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

लहान विक्रेत्यांची पसंती फक्त जयश्रीताई… जयश्री महाजन यांची प्रचार रॅलीत विक्रेत्यांचा एकच नारा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव (सुनिल भोळे) : –  शहरातील लहान विक्रेते आणि रस्त्यावरील छोटे व्यावसायिक जयश्री महाजन यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी आज (दि.११) हरेश्वर नगरातून आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली. या रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या असंख्य नेत्यांसह कार्यकर्ते, समर्थक, आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

- Advertisement -

Only Jayashree Tai

सकाळी ८ ते १२ दरम्यान प्रभाग क्रमांक ९ मध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी काढलेल्या प्रचार फेरीचा व्हिडीओ बातमीसाठी. या प्रचार फेरीचा शुभारंभ हरीहरेश्वर मंदीर द्रौपदी नगर येथे झाला. त्यानंतर शर्मा सांडू कंपनी, प्रितम स्वेअर्स, देवकीनंद हॉल, दिलासा व्यसनमुक्ती केंद्र, बेंडाळे स्टॉप, कृष्णा टॉवर, केरळी मंदीर, स्वामी समर्थ मंदीर, तेली वाडा, शिवरत्न चौक, निवृत्तीनगर, एस.एम.आय.टी. रोड, गुजर गल्ली, बालविश्व स्कूल, श्री रेसिडेन्सी, साई होमिओपॅथी या मार्गे म्युनिसिपल इंजिनिअर भागवत पाटील यांच्या घरासमोर प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.

- Advertisement -
Only Jayashree Tai
Only Jayashree Tai

प्रचार रॅलीच्या दरम्यान जयश्री महाजन यांनी रस्त्यावरील लहान विक्रेत्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विक्रेत्यांनी त्यांच्यासमोर भेडसावणाऱ्या अडचणी मांडल्या, ज्यामध्ये जागेच्या अभावामुळे होणारा त्रास तसेच आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव यांचा समावेश होता. जयश्री महाजन यांनी या समस्या ऐकून त्यांना त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले.

Only Jayashree Tai
Only Jayashree Tai

यावेळी भाजीपाला विक्रेत्या महिलांनी महाजन यांच्याशी गप्पा मारत आपल्या अडचणींविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर, लहान दुकानदारांशी संवाद साधत त्यांच्या व्यवसायातील अडचणी समजून घेतल्या. जयश्री महाजन यांनी विक्रेत्यांना आश्वस्त केले की, निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

जयश्री महाजन यांनी शिवसेना पक्षाच्या “मशाल” चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. महाजन यांच्या या प्रचार मोहीमेला शहरातील लहान विक्रेत्यांनी पाठिंबा दर्शविला असून, त्यांच्या समस्यांचे निराकरण होईल या विश्वासाने ते महाजन यांच्याशी एकत्र आले आहेत. या प्रचार मोहिमेदरम्यान जयश्री महाजन यांना मिळणारा प्रतिसाद पाहता, लहान विक्रेत्यांनी जयश्रीताई यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांच्या प्रचाराला अधिक बळ देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

RECENT NEWS