साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील अनेक तरुणांना ग्रामीण भागात नोकरी व रोजगार नसल्याने अनेक तरुण शहराकडे धाव घेत आहे त्याच तरुणासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत फिजिशियन, प्रसूती, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदांच्या एकूण २१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२३ –
पदाचे नाव – फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ.
एकूण पदसंख्या – २१
शैक्षणिक पात्रता –
फिजिशियन – MD Medicine/ DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोग तज्ञ – MD Paed /DCH/DNB
नेत्ररोग तज्ञ – MS Ophthalmologist/ DOMS
त्वचारोग तज्ञ – MD (Skin/VD), DVD, DNB
मानसोपचार तज्ञ – MD Psychiatry/DPM / DNB
ईएनटी तज्ञ – MS EN T/ DORL/ DNB
वयोमर्यादा – ७० वर्षे.
अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक कक्ष, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी – ४११०१८
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरू होण्याची तारीख – १२ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२३