नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अनेक तरुणाचे शिक्षण दहावी पर्यत झाले असते त्यांना सरकारी नोकरी मिळेल अशी आशा देखली नसते पण दहावी उत्तीर्ण तरुणांना महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती सुरु आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळणार आहे. टियर 1 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोने, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी ग्रेड-2/टेक्निकलच्या एकूण 797 पदांसाठी भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा आता नवीन जारी केला आहे. याअंतर्गत एकूण 677 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
आयबीने एम्प्लॉयमेंट न्यूज वीक 14-20 ऑक्टोबर 2023 मध्ये यासंदर्भात जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुरक्षा सहाय्यक / मोटर ट्रान्सपोर्ट (SA/MT) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ / जनरल (MTS/जनरल) च्या एकूण 677 पदांसाठी भरती केली जाणार आहे. इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मोटर ट्रान्सपोर्ट, मल्टी-टास्किंग स्टाफ भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइट mha.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.