साक्षीदार | १६ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील उच्च शिक्षित तरुणांना नोकरी करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नुकतेच भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ज्युनिअर एक्सिक्युटीव्ह पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी ४९६ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2023
पदाचे नाव – ज्युनिअर एक्सिक्युटीव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल).
एकूण रिक्त पदे – ४९६
शैक्षणिक पात्रता – फिजिक्स व मॅथेमॅटिक्स विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला प्रवर्ग – १००० रुपये.
मागासवर्गीय – फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
अर्ज करण्यासाठीचा पत्ता – https://www.aai.aero/en/careers/recruitment