साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | अनेक तरुण कृषी क्षेत्रात अभ्यास करून पदवी देखील घेत असतात, पण शासकीय नोकरी नसल्याने ते खाजगी क्षेत्रात नोकरी करीत असतात पण अशाच तरुणांना एक मोठी संधी मिळाली कृषी विभाग, गोवा अंतर्गत नोकरीची संधी निर्माण झाली आहे.
या माध्यमातून ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – कृषी विभाग, गोवा
भरले जाणारे पद – ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम), सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक
पद संख्या – 6 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य नोडल अधिकारी (एटीएमए) / कृषी संचालक यांचे कार्यालय, कृषी संचालनालय, कृषी भवन, टोंक, करंझाळे-गोवा
नोकरीचे ठिकाण – गोवा
वय मर्यादा – 18 ते 45 वर्षे
भरतीचा तपशील –
पदाचे नाव पद संख्या
ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम) ०३
सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक ०३
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम) आयसीएआर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडून एम.एस्सी. (ॲग्री/हॉर्टी) किंवा आयसीएआर मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाकडून बी.एस्सी. (ॲग्री/हॉर्टी)
सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक बी.एस्सी
मिळणारे वेतन –
पद मिळणारे वेतनश्रेणी
ब्लॉक टेक्नोलॉजी मॅनेजर (बीटीएम) Rs. 30,000/-
सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक Rs. 25,000/-
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.