Job
साक्षीदार | ८ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक उच्च शिक्षित तरुण आज देखील बेरोजगार असून त्यांच्यासाठी अनेक खाजगी क्षेत्रात नोकरी असतांना नुकतेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत प्रोबेशनरी इंजिनिअर, प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी अकाऊंट ऑफिसर पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२३ आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२३
पदाचे नाव – प्रोबेशनरी इंजिनीअर, प्रोबेशनरी ऑफिसर, प्रोबेशनरी अकाऊंट ऑफिसर
एकूण रिक्त पदे – २३२
शैक्षणिक पात्रता –
प्रोबेशनरी इंजिनीअर : संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
प्रोबेशनरी ऑफिसर : ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन/ पर्सनल मॅनेजमेंट विषयात MBA/ MSW/ PG/ PG डिप्लोमा.
प्रोबेशनरी अकाऊंट्स ऑफिसर : CA/ CMA.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात पाहा.
ओबीसी – ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी/ EWS – ११८० रुपये.
मागासवर्गीय – कोणतीही फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.