Dharmarath Foundation | साक्षीदार न्यूज | आजारातून बरे होताना किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना अनेकदा महागड्या वैद्यकीय साहित्याची गरज भासते. हीच गरज ओळखून धर्मरथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील शिवाजीनगर परिसरात ‘ऑर्थोपेडिक लायब्ररी’ हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
रुग्णांच्या सेवेसाठी हक्काचे ठिकाण
ज्या रुग्णांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे किंवा जे गंभीर आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत, अशा रुग्णांना बरे होण्याच्या काळात मदतीचा हात म्हणून ही लायब्ररी कार्यरत राहणार आहे. अनेकदा महागडी उपकरणे विकत घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही, अशा वेळी या लायब्ररीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.
उपलब्ध होणारे साहित्य
-
व्हीलचेअर आणि वॉकर
-
सेमी फोलर बेड आणि वॉटर बेड
-
टॉयलेट सीट
-
वेस्ट बेल्ट आणि नी बेल्ट इत्यादी.
मान्यवरांची उपस्थिती
या उद्घाटन प्रसंगी प्रांतपाल (डिस्ट्रिक्ट ३०३०) ज्ञानेश्वर शेवाळे, धर्मरथ फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, सचिन जेठवाणी, सागर मुंडला, विपुल पटेल, माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे, उत्तम शिंदे, संतोष पाटील, अंकुश कोळी, महेश चौधरी, भगवान सोनवणे, दिलीप नाझरकर, विजय जगताप, विजय बांदल, अकिल पटेल, कामिल दादा, हितेश सुराणा, अनमोल मलिक, हर्षल राजपूत आणि अनिकेत पोळ यांसह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धर्मरथ फाउंडेशनतर्फे परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्यांच्या घरात रुग्ण आहेत आणि ज्यांना अशा साहित्याची गरज आहे, त्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.








