Ajit Pawar maratha reservation ; आरक्षणाला आमचा पाठींबा ; अजित पवार गट !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरु केले आहे. तर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका देखील जाहीर केली आहे. मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यास आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ठाण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्र प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक आनंद परांजपे, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

- Advertisement -

तटकरे म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष, महाराष्ट्रात ‘मिशन ४५ ‘ मोहीम रावणार आहे. तीनही पक्षांचे राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा एकत्रित निर्णय घेणार आहेत. योग्यवेळी तीनही पक्षांतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय टीम, जसे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष म्हणून मी स्वतः, केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल, तसेच दोन्ही पक्षातील केंद्रस्तरीय नेते हे एकत्रित बसून महाराष्ट्रातील लोकसभा जागेबाबत निर्णय घेतील. तो आम्हा तीनही पक्षांना मान्य असेल. दिवाळीपूर्वी मी राज्याचा दौरा करणार आहे. दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहोत, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात, न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. तसेच अल्पसंख्याक समाजालाही ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक बाबींवर हे आरक्षण काही टिकले नाही. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली समितीने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाची सांख्यिकी माहिती जमा केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनेही तसेच उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेही आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आजही जरांगे-पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा जाहीर पाठिंबा आहे. मराठा समाजाला यासाठी आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे. इतरही समाजाची आरक्षणाची मागणी आहे. त्याचेही आम्ही समर्थन करतो, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Ajit Pawar maratha reservation

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS