साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३
मुक्ताईनगर तालुक्यातील एका ३० वर्षीय विवाहितेला शेतात नेत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पिडीत महिलेच्या परिवाराने मुक्ताईनगर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय विवाहिता शेताजवळून जात असताना संशयित बाळकृष्ण वाघ याने पीडीत विवाहितेला केळी बागेत नेत धमकावून अत्याचार केला तसेच अश्लील अवस्थेती फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडीतेने काही दिवस घाबरून पतीला हा प्रकार सांगितला नाही. मात्र नंतर हिंमत करून पीडीतेने घडलेला प्रकार पतीला कथन केल्यानंतर मंगळवारी दाम्पत्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.