back to top
शनिवार, सप्टेंबर 27, 2025

Geeta Jayanti ; ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस आणि गीता जयंतीचे यशस्वी आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चोपडा ; – येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित Oxford English Medium School ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गीता जयंती देखील उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते द्विपप्रज्वलन करुन तसेच श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथाचे आणि थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, उपमुख्याध्यापक अमन पटेल तसेच शाळा समन्वयक अश्विनी पाटील, सुचिता पाटील दीप्ती पाटील आणि दिपाली पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

- Advertisement -

 

कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून अखिल मानवाला मार्गदर्शन केले. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक मानवास सतत मार्गदर्शक असणाऱ्या श्रीमद्भगवद्गीतेतील प्रत्येक श्लोक आजही प्रत्येकास अनमोल मार्गदर्शन करतो. गीता जयंती निमित्त शाळेतील शिक्षिका कल्पना बारी यांनी विद्यार्थ्यांना भगवान श्रीकृष्णांनी गायलेल्या श्रीमद्भगवद्गीते विषयी सखोल मार्गदर्शन केले.

- Advertisement -

शाळेतील शिक्षिका विशाखा बडगुजर यांनी विद्यार्थ्यांना महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवन कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दरवर्षी २२ डिसेंबर हा दिवस श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्यांना ओळखण्यासाठी आणि लोकांमध्ये गणित विषयाचे महत्त्व आणि उगम याची जाणीव करून देण्यासाठी ‘राष्ट्रीय गणित दिवस’ म्हणून देशभरात साजरा केला जातो. राष्ट्रीय गणित दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना श्रीनिवास रामानुजन यांच्या चरित्रावर आधारित चित्रपट दाखवण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना बारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील कला शिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Geeta Jayanti

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS