Jalgaon Road Accident | पाचोऱ्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात! कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Road Accident पाचोरा |साक्षीदार न्यूज  | पाचोरा–जळगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

- Advertisement -

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील एका गावात कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना, मध्यरात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास पाचोरा–जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ ही कार अचानक रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार धडकली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की कार दोन ते तीन वेळा पलटी झाली.

या अपघातात महावितरणचा विजेचा तारा तुटला असून कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या दुर्दैवी घटनेत श्रीरंग सुरेश पाटील आणि प्रसन्न रवींद्र निमजे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. इनोव्हा कारचे दरवाजे अडकले असल्याने रुग्णवाहिका चालकांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले.

- Advertisement -

अपघातानंतर कारचे रेडिएटर प्रचंड तापल्याने आग लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र ही परिस्थिती लक्षात येताच रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी तात्काळ गाडीवर पाणी टाकून मोठा अनर्थ टाळला.

या अपघातातील जखमींना तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. येथे डॉ. सागर गरुड यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ उपचार सुरू करत जखमींचे प्राण वाचवले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, भागवत पाटील, गोलू पाटील तसेच किशोर लोहार यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी गजानन जोशी, दिलीप पाटील, दिलीप वाघमोडे, अशोक पाटील, वाशिम शेख आणि गजानन देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.

या अपघाताची नोंद पाचोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करत आहेत.

Jalgaon Road Accident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS