Chhatrapati Sambhajinagar Crime: बहिणीला भेटाण्यासाठी गेला आणि भलेच काही करून बसला . दारूच्या नशेत २४ वर्षीय युवकाने घरासमोर राहत असणाऱ्या ८५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार करीत तिला साडीने गेला दाबून खून केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पाचोरा तालुक्यातील भोजे चिंचपुरे येथील गुलाब आबा बेलदार हा २४ वर्षीय युवक आपल्या बहिणाला छत्रपती संभाजीनगर येथे भेटण्यासाठी होता . याठिकाणी दारूच्या नशेत या नराधमाने बहिणीच्या घरासमोर राहत असलेल्या एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुलाब हा दारूच्या नशेत घरात घुसला आणि त्या वृद्धेवर बलात्कार करून तिचा साडीने खून केल्याची खळबळ जनक घटना वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथे मंगळवारी उघडकीस आली. पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळत अटक करण्यात आली आहे .
गुलाब आबा बेलदार (वय २४, रा. भोजे चिंचपुरे ता. पाचोरा जिल्हा जळगाव) असं २४ वर्षीय नराधमाचं नाव आहे. दरम्यान, पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहे. गुलाबची बहीण हि लोणी खुर्द या गावात वास्तव्यास आहे . गुलाब आपल्या बहिणाला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला होता आणि घरासमोर राहत असलेल्या ८५ वर्षीय वृद्धेवर त्याने नजर ठेवली हि महिला गेल्या अनेक वर्षांपासून घरात एकटी राहत होती.
सोमवारी रात्री हि महिला झोपी गेली. यावेळी पहाटे दोनच्या सुमारास गुलाब हा दारूच्या नशेत वृद्ध महिलेच्या घरात गेला आणि वृद्ध महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेवर बलात्कार केल्यावर तिचे डोके भिंतीवर आपटले, या झालेल्या झटापटीत महिलेच्या डोक्याला जबर मार लागला त्यानंतर गुलाबने दारुच्या नशेत वृद्ध महिलेस साडीच्या साह्याने गळा आवळून तिचा खून केला.
सकाळची घरातून कसलाही आवाज येत नाही हे बघून शेजारी पाजारी यांनी घरात पाहिल्यावर धक्कदायक चित्र समोर आले . या ठिकाणी गुलाबने संगीतातले ”घरात चोर आले होते. त्यांनी मला मारहाण केली ते पळून गेले”, असा बहाणा त्याने केला. ही माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनेच्या ठिकाणी आल्यावर गुलाबने हि माहिती पोलिसांनी दिली मात्र पोलिसांनी गेलाबवरच संशय आला त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांचा हिसका दाखविल्यावर गुळा पोपटासारखा बोलू लागला या घटनेचा पोलीस पुढील तपास करीत आहे .