पहूर, ता.जामनेर ;- येथून जवळच असलेल्या पाळधी शिवारात पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या पथकाने गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
- Advertisement -
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथून जवळच असलेल्या पाळधी गाव शिवारातील वाघूर नदीकाठी ईश्वर झिप्रू भोई, व कैलास झिप्रू भोई यांचे गावठी हातभट्टीवर कारवाई करून अंदाजे 1200 लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य जागीच नाश केले या कारवाईमुळे पाळधी गावात खळबळ उडाली आहे . पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पीएसआय सुस्ते, पोलीस कॉन्स्टेबल ढाकरे ,गोपाल माळी, राहुल पाटील ,हेमंत सोनवणे यांनी ही कारवाई केली.सदर कारवाई मुळे पहूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
- Advertisement -