पाली भाषेला मिळाला अभिजात दर्जा – दीक्षाभुमी स्मारक समिती अचलपूर च्या पाठपुराव्याला आले यश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

बौद्ध बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

- Advertisement -

साक्षीदार न्युज ; – गुरुवारी झालेल्या केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकित झालेल्या महत्वाच्या निर्णयात माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला महाराष्ट्राच्या मराठी जनतेला या निर्णयाने खुपच आनंद झाला . आम्हाला माय मराठीचा खरा अभीमान आहे . सोबतच अडीच हजार वर्षांपासून सर्वांच्या लाडकी असलेली बोलीभाषा म्हणजेच पाली या भाषेला अभिजात भाषेचा दर्जासुद्धा मिळाला आहे. भगवान गौतम बुद्धांचा संपूर्ण उपदेश त्यांचे प्रवचन पाली भाषेतच उपलब्ध आहे. या निमित्ताने पाली भाषेचे संशोधन व पूर्नविकास होण्यासाठी मदत मिळणार आहे . पाली भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळावा अनुसुचि आठ मध्ये अंतर्भाव करावा व महाराष्ट्रात पाली भाषेचे विद्यापीठ तयार करण्यात यावे अश्या रास्त मागणी चे निवेदन दिक्षाभूमी स्मारक समिती संस्था (रजी ) अचलपूर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांना उपविभागीय अधिकारी अचलपूर मा. बळवंतराव अरखराव यांच्या मार्फत २3 फेब्रु. २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री किशोरभाऊ मोहोड सचिव श्री प्रभाकरराव मोहोड तसेच सन्माननीय सदस्य प्रमोद भाऊ कांबळे . विलासभाऊ थोरात यांनी दिले . मा. SDO साहेब यांनी तातडीने ही मागणी मा. मुख्यमंत्री तसेच मा. पंतप्रधान यांना पाठविली व तशी पोहोच समितीला दिली .

समिती नेहमीच दुरदृष्टी ठेउन काम करीत आहे. भारत सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला त्यामुळे संपूर्ण भारतात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे त्यासाठी पाठपुरावा दीक्षाभुमी स्मारक समितीने सुद्धा केला व त्यांच्या पाठपुरावाला लवकरच यश मिळाले म्हणून समिती केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाचा अभिनंदनाचा ठराव घेत आहे .

- Advertisement -

पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तर मिळालाच आता आमची पुढील लढाई पाली विद्यापीठ निर्मितीची आहे . येत्या दोन ते तिन वर्षातच पाली विद्यापीठ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आंबेडकरी जनतेने समितीला सहकार्य करावे तसेच भक्कम पाठबळ सुद्धा द्यावे .पाली भाषेचे विद्यापीठ तयार झाल्या वर महाराष्ट्रातील पहिले पाली महाविद्यालय अचलपूर येथेच स्थापन करण्यात येईल . असा समितीचा मानस आहे .पाली भाषेच्या संवर्धनामुळे शैक्षणीक संशोधन क्षेत्रात अनेक रोजगार निर्माण होणार आहेत . पाली भाषेला सुगीचे दिवस येणार आहेत. म्हणून या शुभप्रसंगी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच महाराष्ट्र व भारत सरकारचे मंत्रीमंडळ यांचे शतशः अभिनंदन !

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS