Tadvi Bhil Community | भव्य सामूहिक विवाहाची घोषणा! परसाडे बु येथे आदिवासी तडवी भिल समाजासाठी सुवर्णसंधी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Tadvi Bhil Community यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील परसाडे बु येथे आदिवासी तडवी भिल समाजासाठी भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत परसाडे बु व समस्त ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा तिसऱ्या वर्षीही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

- Advertisement -

दिनांक 12 एप्रिल 2026, रविवार रोजी दुपारी 12 वाजता पारंपरिक पद्धतीने हा विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असून, समाजातील गरजू कुटुंबांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.

सामूहिक विवाहाच्या माध्यमातून कमी खर्चात आणि सामाजिक एकोप्याने विवाह पार पाडण्याची संधी उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आदिवासी तडवी भिल समाजातील इच्छुक वधू-वरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • वधू-वरांचे ५ पासपोर्ट फोटो
  • जातीचा दाखला
  • आधार कार्ड
  • जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
वयोमर्यादा
  • वधू : किमान १८ वर्षे
  • वर : किमान २१ वर्षे
संपर्क

सौ. मीनाताई तडवी (सरपंच) – 7083258616
सुलेमान तडवी (उपसरपंच) – 8390847595
रोशन तडवी (ग्रा.प. सदस्य) – 7263848786
नसिम तडवी – 9049058383
फिरोज तडवी – 9359612497
गफुर तडवी – 7855581215
अलाउद्दीन तडवी – 9356650077

सामाजिक एकोपा, परंपरा आणि आर्थिक बचत यांचा सुंदर संगम असलेला हा सामूहिक विवाह सोहळा परसाडे बु गावासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. अधिकाधिक वधू-वरांनी सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केले आहे.

Tadvi Bhil Community

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ashok Kharat | खरात कनेक्शनचा धडाका! चाकणकरांनंतर आता बड्या...

Ashok Kharat | साक्षीदार न्यूज | राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवे धागेदोरे समोर येत असून, आता या प्रकरणाची झळ प्रशासकीय...

Godavari Hospital | गोदावरी हॉस्पिटलमध्ये मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर हलगर्जीमुळे तरुणाचा...

Godavari Hospital नशिराबाद | साक्षीदार न्यूज | साकेगाव येथील गोदावरी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, या...

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

RECENT NEWS