साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात भव्य सभेत मनोज जरांगे पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका केली. त्यासोबतच पाटील यांनी सरकारविरुद्धात लढा सुरू केलाय. आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी राज्यातील राजकारणात मोठं रान पेटवलं आहे. सदावर्ते हे फडणवीसांचे कार्यकर्ते आहेत. आरक्षण देण्यास सरकारकडे आता फक्त १० दिवस उरले असल्याची आठवण करून दिली. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणातून सांगितलं आहे, की सरकारने १० दिवसात आरक्षण दिल नाही तर माझं मरण पाहावं लागेल. यावर बच्चू कडू म्हणाले की, जरांगे पाटलांनी टोकाचं पाहूल उचलू नये. सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास सकारात्मक आहे. मराठा आरक्षण प्रश्न सर्वोच्च न्यायालयात अडकलाय. जर सर्वोच्च न्यायालयच निकाल मराठांच्या बाजूंनी आलं तर लगेच आरक्षण दिलं जाईल. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे. तुमच्या हातात ४० दिवसांपैकी ३० दिवस झालेत अजून १० दिवस आहेत. आज हा लाखोंचा जनसागर अंतरवालीत उसळला आहे, त्यांचं एकच म्हणणं आहे. राहिलेल्या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. माझ्या माय बाप मराठा समाजाने जो शब्द दिला आहे, त्या शब्दावर तो आजही ठाम आहे. ४० दिवस आम्ही एक शब्द सरकारला विचारणार नाही असा शब्द दिला होता. आता आणखी १० दिवस आहेत. या १० दिवसात मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. जर तुम्ही नाही दिलं तर ४०व्या दिवशी सांगू, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.