Jalgaon Crime News ब्रेकिंग न्यूज । पिंप्राळा किरकोळ वादाचा शेवट तरुणाच्या मृत्यूत, परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील पिंप्राळा परिसरात १ फेब्रुवारी रोजी घडलेल्या एका किरकोळ वादाचा शेवट अत्यंत भयवनाक ठरला आहे. प्रशांत पाटील चौकात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेला २१ वर्षीय तरुण शुभम गजानन सपकाळे याचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना दिसून येत आहे.

- Advertisement -

घटनेच्या दिवशी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम सपकाळे हा सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना काही संशयितांनी त्याला अडवले. कोणतेही ठोस कारण नसताना विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा कोळी, यश प्रदीप पाटील (बाँड) आणि धीरज कोळी यांनी संगनमत करून त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती.

या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात यापूर्वीच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शुभमचा मृत्यू झाल्यानंतर या गुन्ह्यात आता नवीन कलमानुसार कलम १०३ (खून) वाढवण्याची प्रक्रिया पोलीसांकडून करण्यात येत आहे .

- Advertisement -

शुभमच्या मृत्यूची बातमी समजताच पिंप्राळा परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिसांकडून पिंप्राळा परिसरात तसेच शुभमच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शुभमचा मृतदेह शुक्रवारी सकाळी १२ वाजेच्या दरम्यान जळगावात आणला जाण्याची शक्यता असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

LIVE । दादांना अखेरचा निरोप । लाखो जनसमुदायांच्या डोळ्यात पाणी…

राजकारणातील ” दादा ” माणूस गेला

Jalgaon Crime News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS