यावल; – सावखेडा सिम येथील पीरगैबन शहावली बाबांचा सहा व सात जानेवारी रोजी यात्रा उत्सव हजारो लोक घेणार कव्वालीचा लाभ दहिगाव ता यावल येथून जवळच असलेल्या जागृत देवस्थान पिरगैबन शाहवली बाबा यांचा यात्रोत्सव सहा व सात रोजी होणार आहे यानिमित्ताने सात जानेवारी रोजी मनोरंजन म्हणून कव्वालीचा भव्य मुकाबला आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक सहा रोजी भव्य अशी संदल रॅली काढण्यात येणार आहे बाबांच्या दर्गावर जिल्हाभरातून हजारो भाविक येऊन आपल्या मानलेल्या मानता देत असतात व भव्य रॅली ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या वाद्या काढण्यात येत असतात दिनांक सात रोजी यात्रा उत्सवाच्या आयोजन असून यात्रेनिमित्ताने जुनेद सुलतानी आणि परविन रंगोली यांचा भव्य कव्वालीचा मुकाबला आयोजित करण्यात आलेला आहे याचा लाभ घ्यावा असे आव्हान हिंदू मुस्लिम पंच कमिटी सावखेडा सिम यांनी केलेले आहे