Punjab National Bank fraud | बँकिंग क्षेत्रात खळबळ! पंजाब नॅशनल बँकेत 2434 कोटींचा लोन घोटाळा उघड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Punjab National Bank fraud | साक्षीदार न्यूज | देशातील बँकिंग क्षेत्राला हादरवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या Punjab National Bank (PNB) मध्ये तब्बल 2434 कोटी रुपयांचा लोन घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणाची अधिकृत माहिती बँकेने Reserve Bank of India (RBI) कडे दिली असून, संबंधित आर्थिक अनियमिततेबाबत तपास सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

या घोटाळ्यात SREI Equipment Finance आणि SREI Infrastructure Finance या एसआरईआय समूहातील दोन कंपन्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेच्या स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या निवेदनानुसार, एसआरईआय इक्विपमेंट फायनान्सशी संबंधित फसवणूक सुमारे 1241 कोटी रुपये, तर एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सशी संबंधित रक्कम 1193 कोटी रुपये इतकी आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, या दोन्ही प्रकरणांतील थकबाकीसाठी बँकेने 100 टक्के तरतूद (Provisioning) आधीच केली आहे. त्यामुळे या घोटाळ्याचा बँकेच्या आर्थिक स्थितीवर किंवा ग्राहकांच्या ठेवींवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे PNB कडून स्पष्ट करण्यात आले आहे. बँकेच्या ग्राहकांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, या दोन्ही कंपन्यांवर कॉर्पोरेट दिवाळखोरी ठराव प्रक्रिया अंतर्गत National Company Law Tribunal (NCLT) मध्ये कारवाई करण्यात आली होती. NCLT च्या निर्देशांनुसार पुनर्रचना प्रक्रिया राबवण्यात आली असून, ऑगस्ट 2023 मध्ये NARCL योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित कंपन्यांच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.

एसआरईआय समूहाने 1989 साली वित्त क्षेत्रात प्रवेश केला होता आणि विशेषतः बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रात या समूहाची ओळख होती. मात्र, खराब आर्थिक नियोजन आणि वाढत्या थकबाकीमुळे ऑक्टोबर 2021 मध्ये या समूहावर दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झाली.

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेसाठी ही बाब आर्थिकदृष्ट्या फारशी चिंताजनक नसल्याचे चित्र आहे. बँकेने सप्टेंबर तिमाहीत 643 कोटी रुपयांची तरतूद केली असून, तरतुदींचे प्रमाण 96.91 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. हा बँकेच्या आर्थिक शिस्तीचा आणि भविष्यातील स्थैर्याचा सकारात्मक संकेत मानला जात आहे.

जागा वाटपावरून शिवसेना युतीमधून बाहेर पडणार का ? शिंदे गटाने दिला अल्टिमेटम
“रुग्णवाहिका अडकली, पोलीस निघून गेले! निवृत्त पोलिसांनीच वाचवला खॉजामिया चौक”

अजित दादा भाजप बरोबर नाही

मित्रांनीच केला खून, मृतदेह पोत्यात बांधून धरणात टाकला

Punjab National Bank fraud

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS