जळगावात पोलिसांची कारवाई : सट्टा, मटका क्लबवर एकाच वेळी छापा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ८ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील राजकमल टॉकीज आणि सुभाष चौक परिसर या दोन ठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या सट्टा, मटका क्लबवर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने छापा टाकून चार जणांवर कारवाई केली. या दोन ठिकाणच्या कारवाईत एकूण ३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष डेअरी आणि शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजकमल टॉकीज परिसरात अवैधरीत्या सट्टा व मटका क्लब सुरू असल्याची गोपनीय माहिती संदीप गावित यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मंगळवार, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी पोकों सचिन साळुंखे, नाना तंवर, पोहेकॉ रवींद्र बोदवडे, राहुल पाटील, बालाजी बारी, मनोहर वानखेडे यांनी दोन्ही ठिकाणी छापा टाकून संशयित सचिन आनंदा जाधव (२५, रा. जोशीपेठ), संजय भाऊलाल चौधरी आणि सखाराम भटू चौधरी या तिघांना ताब्यात घेतले तर एकजण फरार झाला आहे. या कारवाईत ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS