back to top
शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025

Police drugs school ground ; शाळेच्या पटांगणातून ५ हजारांच्या ड्रग्जसह सेल्समनला पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | राज्यभरात गेल्या काही दिवसापासून ड्रग्सवर पोलिसांची बारीक लक्ष असून कारवाई देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अशीच एक कारवाई अमरावती शहरात देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री नागपुरी गेट भागातील ॲकेडमिक शाळेच्या पटांगणात एका सेल्समनकडून पाच हजारांची एमडी ड्रग्स व ६० हजारांचा मोबाइल जप्त करण्यात आला. नागपुरी गेट पोलीस व गुन्हे शाखेतील दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली. फिरोज खान सैफुल्ला खान (२७, साबनपुरा) व अल्तमश गफ्फार (२०, रा. अन्सार नगर, गवळीपुरा रोड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

फिरोजखान याला ॲकेडमिक शाळेच्या पटांगणातून अटक करण्यात आली. त्याच्याच ताब्यातून पाच हजार रुपये किमतीची २.६३० ग्रॅम एमडी व मोबाइल जप्त करण्यात आला. ती एमडी अल्तमश गफ्फार याची असून, ती त्याने आपल्याकडे विक्रीकरिता दिल्याची कबुली फिरोजखान याने दिली. त्यानुसार त्यालादेखील आरोपी करण्यात आले. ४ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे यांना ॲकॅडेमिक ग्राउंडवर फिरोज खान नावाचा इसम हा एमडी नावाचा अमली पदार्थ लोकांना विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यासाठी नागपुरी गेट पोलीस ठाणे व तेथील डीबी पथकाची मदत घेण्यात आली.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनात नागपुरीगेटचे ठाणेदार अनिल कुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत, सहायक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, उपनिरीक्षक सुशील कोडापे, महेंद्रसिंह येवतीकर, अंमलदार अशोक वाटाणे, मंगेश लोखंडे, संजय भारसाकळे, शंकर बावनकुळे, आशिष करपे, आनंदसिंग ठाकुर, रणजित गावंडे, रियाज खान, शेख आबीद, प्रवीण पोकळे, प्रवीण पुनोते, अमोल मोहोड, राहुल रोडे व आबीद यांनी ही कारवाई केली.

Police drugs school ground

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Foreign Tours | सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांचे नवीन नियम...

Foreign Tours | साक्षीदार न्यूज | महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवर कडक निर्बंध घातले आहेत. आता या दौऱ्यांचा राज्य सरकारला नेमका काय फायदा...

Meera Borwankar | राजकीय हस्तक्षेपामुळे मालेगाव, 7/11 बॉम्बस्फोट आणि...

Meera Borwankar | साक्षीदार न्यूज | माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी मालेगाव बॉम्बस्फोट, 7/11 ट्रेन बॉम्बस्फोट आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील पीडितांना...

Fadnavis Support Pawar, Thackeray | फडणवीसांचा पवार-ठाकरेंना फोन, राजकीय...

Fadnavis Support Pawar, Thackeray | साक्षीदार न्यूज | जगदीप धनकड यांनी अचानक राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी...

RECENT NEWS