साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरातून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत असतांना भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी मोठी कारवाई करीत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या जवळील ७ दुचाकी देखील जप्त केल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरात दुचाकी चोरी करून संशयित आरोपी फिरत असल्याची गुप्त माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान पोलीस पथकाने शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भुसावळ शहरात कारवाई करत संशयित आरोपी सैय्यद शहारुख सैय्यद रहेमान (वय-२९, रा. पंचशिल नगर भुसावळ) याला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून या दुचाकी अमळनेर, जळगाव आणि भुसावळ शहरातून चोरी केल्याचे सांगितले ही चोरी त्याचे साथीदार दानिश उर्फ गोलू शरीफ खान (वय-२४ रा. दिन दयाल नगर, भुसावळ), आणि कामीलोद्दीन अजीजउद्दीन (वय-३०, रा. फैजपुर ता. यावल) यांच्यासोबत केल्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी दोघांनाही देखील अटक केली आहे. तिघांकडून चोरीच्या ७ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात संशयितांना हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधीकारी कृष्णात पिंगळे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये, पोउनि मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, सुनील जोशी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचीन चौधरी अश्यांनी केली. पुढील तपास पोहेकॉ विजय बळिराम नेरकर आदींनी हि कारवाई केली.