Police Officer Transfer – साक्षीदार न्युज ; – पोलीस विभागातील कर्मचारी हे नेहमी तणावातून काम आकारात असतात हे आपण सर्वांना माहीतच आहे . आणि या तणावामधून अनेकांनी आपले जीवन देखील संपविलयाच्या घटना आपण ऐकत असतॊ काही दिवसांपूर्वी एक पोलिस अधिकाऱ्याने स्वतः बंदुकीची गोळी घालून आत्महत्या केली आहे .आणि आज मुंबई सांताक्रुझ मधील पूर्वेत वाकोला पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारे कलिना पोलीस कॅम्पमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .
याबाबत सविस्तर माहिति अशी कि , सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बनसोडे असे त्यांचे नाव असून यांनी त्यांच्या राहत्या घराच्या टेरेसवर संध्याकाळी 8 वाजेच्या च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करणारे पोलीस अधिकारी प्रल्हाद बनसोडे हे मुंबई पोलिसांचा BDDS पथकात कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेलं नाही पोलीस अधिकारी प्रल्हाद बनसोडे हे मूळ जळगावचे रहिवासी होते. त्यांना जळगावला बदली पाहिजे होती, त्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यांची बदली होत नसल्या कारणाने त्यांनी तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक माहिती समोर येत आहे .
सध्या वाकोला येथील पोलिसांनी ADR दाखल करून घेतली आहे. मुंबई पोलिसातील बनसोडे यांनी एवढे टोकाचा पाऊल का उचललं याबाबत अधिक तपास सुरू आहे.