Police Yaval Crime Investigation General Police ; गुन्हे शोधकामी उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या यावलच्या दोन पोलीसांचा पोलीस महानिरिक्षकांच्या हस्ते सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

यावल ; – येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा गुन्हे शोधकामी उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ बी जी शेखर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला आहे

- Advertisement -

.
यावल तालुक्यातील किनगाव गावात मागील वर्षी अनैतिक संबधातुन भिमराव सोनवणे नांवाच्या व्यक्तिचा निर्दयीपणे खुन करण्यात आला होता, या अत्यंत गुंतागुतीच्या गुन्ह्याचा शोध लावण्यासाठी यावल पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे , पोलिस शिपाई शामकांत धनगर यांनी योग्य दिशेने तपास करीत गुन्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक केली होती , उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बि. जी. शेखर यांच्या हस्ते जळगाव येथे पोलीस अधिक्षक कार्यालयात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले .

जळगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार ,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित , एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किसन नजन पाटील यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थितीत होते .फैजपुर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे , निरिक्षक राकेश मानगावकर, पोलीस उपनिरिक्षक विनोदकुमार गोसावी , पोलिस उपनिरिक्षक राजेन्द्र साळुंके यांच्यासह आदींनी सन्मानपत्र मिळाल्याबद्दल त्यांचे अभीनंदन केले .

Police Yaval Crime Investigation General Police

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS