back to top
शुक्रवार, एप्रिल 18, 2025

Devendra Fadnavis ; नेता, निती व नियतही नसलेली महा आघाडी देशाचा विकास करू शकत नाही – देवेंद्र फडणवीस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Devendra Fadnavis ; साक्षीदार न्युज ; – हि निवडणूक गल्ली ची निवडणूक नाही तर दिल्लीची आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही.फक्त शिव्या देणे हाच त्यांचा अजेंडा आहे. नेता, नीती व नियातही नसलेले हि महा आघाडी आहे असा जोरदार घणाघात महायुतीच्या उमेदवार स्मिता ताई वाघ यांच्या प्रचारासाठी पाचोरा येथील गर्जना सभेत देवेंद्रजी फडणवीस यांनी केला.

- Advertisement -

Devendra Fadnavis

महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून सभेला सुरवात झाली. सभेचे प्रास्तविक पाचोरा – भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले. त्यात त्यांनी जळगाव लोकसभा मतदार संघ हा महायुतीचा मतदारसंघ आहे. भडगाव पाचोरा मतदार संघातून आम्ही एक लाखापर्यंत मताधिक्य देवू अशी हमी दिली.

- Advertisement -

महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, देश जर संरक्षित हातात द्यायचा असेल तर तर मोदिजींचे हात बळकट करा. देशाच्या अर्थव्यवस्थेला टॉप ०५ मध्ये नेण्यासाठी मोदिजीना मतदान करा. मी आज उभी नाही तर मोदिजी उभे आहेत. एका महिलेला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे या वेळी पहिले मतदान कर्त्यव्य माझ्या भगिनी पूर्ण करतील मग आखाजीला गावी जातील असा विश्वास व्यक्त केला.

Devendra Fadnavis

मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या मनोगतात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदार आपण भाजपा महायुतीचे कराल व ४०० पारच्या ऐतिहासिक विजयाचे आपण साथीदार व साक्षीदार असाल असा विश्वास व्यक्त केला.

संकट मोचक, मंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी आपणच आपला लीड तोडण्यासाठी प्रयत्न करत आहात. १० वर्षात सर्वांगीण विकास झालेला आहे. रस्ते, रेल्वे, विमानसेवा दुपटी तिपटीने पुढे जात आहेत. मोदिजींचा करिष्मा सर्व जगात आहे. संरक्षण क्षेत्रातील शस्त्रास्त्रे आपण आपल्या देशातच बनवत आहोत. देश वेगाने पुढे जात आहे तो फक्त मोदी साहेबांमुळे.त्यामुळे जनतेने ठरवले आहे यावेळी मोदिजीना ४०० पार चा पूर्ण करून द्यायचा आहे..

हि निवडणूक गल्ली ची निवडणूक नाही तर दिल्लीची आहे. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नाही.फक्त शिव्या देणे हाच त्यांचा अजेंडा आहे. नेता, नीती व नियातही नसलेली महा आघाडी आहे. स्मिता ताई यांनी जिल्ह्यात प्रचंड काम केलेले आहे. त्यामुळे आपण स्मिता ताईच्या पाठीशी उभे राहाल. कोणाच्या हातात देश सुरक्षित राहील याचा फैसला करणारी हि निवडणूक आहे. आपल्या समोर दोनच पर्याय आहेत. एक जगाला गौरव वाटणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरी कडे राहुल गांधी आहेत. त्यांच्याकडे २४ पक्षाची खिचडी आहे.महायुती म्हणजे विकासाची ट्रेन आहे व मोदिजी त्याचे इंजिन आहेत. सर्वांना मोदीजींच्या विकासाच्या ट्रेन मध्ये बसायला जागा आहे. १० वर्षात २५ कोटी कुटुंबाना गरिबी रेषेतून बाहेर काढले, २० कोटी लोकांना कच्च्या घरातून पक्के घर दिले, ५५ कोटी लोकांच्या घरी शौचालय दिले, ६० कोटी लोकांच्या घरी शुध्द पिण्याचे पाणी आणले. आयुष्यमान भारत योजनेत ५ लाखाचा इलाज मोफत केला .८० कोटी लोकाना मोफत रेशन देत आहेत. हा सर्व विकासाचा रथ मोदिजी ओढत आहेत.आपण या रथाला हातभार लावाल असा विश्वास आहे असे मत देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केले.

गर्जना मेळाव्याला श्री. देवेंद्र फडणवीस, श्री.गिरीश महाजन, श्री. अनिल पाटील. महायुतीच्या उमेदवार श्री. स्मिता ताई उदय वाघ, आमदार श्री. किशोर आप्पा पाटील, आमदार श्री. मंगेश चव्हाण, आमदार श्री. राजू मामा भोळे,आमदार श्री.चिमणआबा पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अमोल शिंदे, श्री. दिलीप वाघ, माजी खासदार ए.टी.पाटील, डॉ.श्री. विकास महात्मे तसेच जळगाव लोकसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे,रिपाई,रासप, एकलव्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Devendra Fadnavis

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kolhapur Wedding Thief | लग्नात पाहुणा बनून आला चोर,...

Kolhapur Wedding Thief  साक्षीदार न्युज । कोल्हापुरातील आदमापूर येथे एका लग्न सोहळ्यात चक्क पाहुणा बनून आलेल्या सराईत चोराने हातसफाई करत ३ लाख ७८ हजार...

Police Sub Inspector Arrests | बस स्थानकात खिसे कापणाऱ्या...

Police Sub Inspector Arrests साक्षीदार न्युज । विश्वास वाडे । चोपडा बस स्थानक परिसरात प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा शहर...

High Court News | पालकांच्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्यांना...

High Court News  साक्षीदार न्युज । अलाहाबाद हायकोर्टाने पालकांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या इच्छेविरोधात लग्न करणाऱ्या जोडप्यांबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अशा जोडप्यांना पोलिस संरक्षणाचा...

RECENT NEWS