कोसगावच्या पूनमची युरोपियन पार्लमेंट मध्ये Software सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Software

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – तालुक्यातील कोसगाव येथील रहिवाशी पुनम विजय चव्हाण हिची युरोपियन पार्लमेंट मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाल्याने जळगाव जिल्ह्यातील डोळे गुजर समाजात तिचे व तिच्या वडिलांचे कौतुक होत आहे

- Advertisement -

युरोपियन पार्लमेंट डेव्हलपर या पदासाठी भारतातून 17000 विद्यार्थी यांनी ऑनलाईन परीक्षा दिली त्यातून प्रथम क्रमांकाने कोसगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथील पुनम विजय चव्हाण हिची निवड करण्यात आली . पुनम हिचे शिक्षण भुसावळ सेंट अलायसिस शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झाले व बारावीपर्यंत औरंगाबाद येथे तर इंजिनिअरिंगला नाशिक येथे तिचे शिक्षण झाले अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये वडिलांनी तिचे शिक्षण केले

पुनम ही मनवेल तालुका यावल येथील आदिवासी आश्रम शाळेत नोकरीवर असलेले विजय चव्हाण सर राहणार कोसगावकर यांची मुलगी असून तिच्या दैदिप्यमान अशा यशामुळे चव्हाण परिवार कोसगाव सह संपूर्ण जळगाव धुळे जिल्ह्यातील डोळे गुजर समाजामध्ये तिचे कौतुक होत आहे . तिच्या यशामुळे कोसगावकरांचे मन सुभे उंचावले असून तिच्या यशामुळे कोसगावकरांचा मानाचा तुरा रोवला गेला आहे एका खेड्यातील रहिवासी मुलगी एवढे उंच शिखर गाठू शकते त्यासाठी वडिलांची मेहनत तिच्या यशा मागील खरे कारण असून ती आपल्या वडिलांनाच या यशाची भागीदार बनवते तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील नामदार गिरीश भाऊ महाजन खासदार रक्षाताई खडसे डोळे गुजर समाजाची जिल्हा अध्यक्ष खर्डी तालुका चोपडा येथील रहिवासी चंद्रशेखर दादा पाटील आणि यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी मनवेल आश्रम शाळेचे अध्यक्ष हुकुमचंद पाटील उपाध्यक्ष यादवराव पाटील या शाळेतील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पत्रकार अरुण पाटील यांच्यासह आदींनी कौतुक केले आहे

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS