Devabhau Foundation | साक्षीदार न्यूज | जळगाव सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे कोळी समाजाचे नेते आणि रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘देवाभाऊ फाउंडेशन’ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जळगाव लोकसभा सहसमन्वयक पदी त्यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे.
सामाजिक कार्याची घेतली दखल प्रल्हाद सोनवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी कोळी महासंघ, ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, आणि नेताजी सुभाषचंद्र बोस रिक्षा युनियनच्या माध्यमातून सक्रिय आहेत. तसेच जळगाव जिल्हा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा आणि कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील नागरिकांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांच्या याच निस्वार्थी सेवेची दखल घेऊन फाउंडेशनचे मुख्य समन्वयक श्री. गजाननराव जोशी यांनी ही महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
दिग्गजांचे लाभणार मार्गदर्शन या निवडीनंतर सोनवणे हे मुख्य समन्वयक श्री. गजाननराव जोशी, प्रदेश सहसमन्वयक डॉ. आशुतोष घोलप (संघटन), सहसमन्वयक श्री. प्रवीण अलाई, श्रीकांत थिटे, विवेक देशकर, सौ. वृंदाताई लाड आणि ॲड. मंदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार आहेत. संघटनेची विचारधारा जोपासत सर्व समाजघटकांच्या न्याय्य हक्कासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रल्हाद सोनवणे यांनी केले.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल राजकीय, सामाजिक आणि रिक्षा संघटनांच्या वतीने जल्लोष करण्यात येत असून सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








