जळगावातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

मुंबई ;- जिल्ह्याच्या राजकारणात सध्या अनेक जण विविध पक्ष सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करून शिव बंधन बांधत असल्याने जळगावच्या राजकारणात भाजपसह शिंदे गटाला हादरे बसत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दि. १३ एप्रिल रोजी मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील नेत्या प्रा. डॉ.अस्मिता पाटील, जळगावच्या भाजपा नगरसेविका सरिता नेरकर यांच्यासह पाचोरा आणि भडगाव येथील नगरसेवकांनी शिवबंधन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

- Advertisement -

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, पाचोरा -भडगाव मतदारसंघातील शिवसेना नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी,सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शहर प्रमुख शरद तायडे, धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, युवा सेना सचिव विराज कावडिया, तालुकाप्रमुख उमेश साहेबराव पाटील , आदी नेत्यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

भारत राष्ट्र समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा टेलर यांना पक्षाचा गमछा देऊन उद्धव ठाकरे यांनी प्रवेश दिला. त्यानंतर पाचोरा शिंदे गटात असलेले प्रा. डॉ. अस्मिता पाटील जळगावच्या भाजपाच्या प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेविका सरिता नेरकर , शिवसेना शिंदे गटाचे मागासवर्गीय सेलचे जिल्हा उपाध्यक्ष गुलाबराव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे विशाल पालवे, शुभम लाड, वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव येथील मोरसिंग राठोड, पाचोरा येथील संदीप सिसोदिया,अनिकेत पाटील,रसूल पिंजारी, भडगाव येथील शब्बीर खान, अब्दुल रहमान, शेख सलीम, राजू शेख, बशीर शेख, मोहसीन शेख, मोहन परदेशी, शफिक टेलर, सुवर्णा पाटील, गायत्री पाटील, लासुर येथील अजय रंगराव देवरे, पंकज देवरे, पाचोरा येथील शेख रसूल, फिरोज पिंजारी, पिंपळगाव हरेश्वर येथील देविदास महाजन आदींनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS