साक्षीदार न्युज : – एरंडोल येथील आरोग्यदूत तथा रूग्णवाहिका चालक विक्की उर्फ युवराज फकिरा खोकरे यांनी रुग्णसेवा अव्याहत सुरू ठेवली असून त्यांच्या अविरत सेवेमुळे हृदय विकाराचा गंभीर आजारातून रुग्णांवर तातडीने उपचार होऊन रुग्णांस जिवदान लाभते.
कृऱ्हे राणीचे ता.भुसावळ येथील महादेव कौतिक बारी वय.वर्षे ४० यांच्या हृदयाला मोठे छिद्र पडले होते.ड्रायवर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह ते करत होते. ते हृदय विकाराने त्रस्त होते. ते स्वतःवरील उपचाराच्या विवंचनेत असताना त्यांना भुसावळ येथील मधु चव्हाण व रवि सिंघोलिया यांनी एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थेट एरंडोल गाठले त्यांची आपबिती कथन केली.
लागलीच विक्की खोकरे यांनी शिर्डी येथील श्री साईबाबा हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.संदिप देवरे यांच्याशी दूरध्वनी व्दारे चर्चा करून स्वता शिर्डी येथे रुग्णास घेऊन गेले व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत हृदयरोगाने त्रस्त असलेल्या महादेव बारी या रुग्णावर डॉ. संदिप देवरे यांनी यशस्वीपणे ह्दय शस्त्रक्रिया करवून त्याचे प्राण वाचवले.
विक्की खोकरे यांच्या प्रयत्नाने एक गरीब कुटुंब सावरले गेले
त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपण गंभीर आजारातून मुक्त होऊ शकल्याची भावना बारी यांनी व्यक्त केली.
विक्की खोकरे यांच्या तत्पर सेवेमुळे आतापर्यंत हजारो रुग्णांचे प्राण वाचले आहेत.