साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | देशभरातील अनेक तरुणांना शिक्षक होण्याचे स्वप्न असते पण गेल्या काही वर्षापासून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही सरकारी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची परीक्षा समजली जाते. या परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार नवोदय आणि केंद्रीय विद्यालयांमध्ये वेळोवेळी जारी केलेल्या शिक्षक भरतीसाठी अर्ज करु शकतात. यामुळे दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसून नशीब आजमावतात.
नवीन वर्षात होणार परीक्षा
जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या सीटीईटी परीक्षेसाठी सध्या नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्विकारले जात आहेत. आता जर तुम्हीही या परीक्षेसाठी फॉर्म भरला असेल तर आज आम्ही तुम्हाला या परीक्षेशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत; ज्या तुम्हाला अभ्यासासाठी निश्चित मदत करु शकतात.
अभ्यासक्रम समजून घ्या
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून परीक्षेचा अभ्यासक्रम समजला नसेल तर आधी तो समजून घ्या. CTET पेपर 1 आणि 2 चा अभ्यासक्रम काय आहे ते जाणून घ्या. जर तुम्ही दोन्ही पेपरसाठी अर्ज केला असेल तर तपशीलवार अभ्यासक्रम अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे, तुम्ही त्याबद्दल माहिती गोळा करु शकता. तसेच परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या.
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा
परीक्षेला खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे अभ्यासक्रमानुसार तुमची विभागणी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही किती दिवसात किती भाग तयार कराल ते ठरवा. त्यानुसार तुमचे (CTET Preparation 2024) पूर्ण वेळापत्रक तयार करा. अभ्यासक्रम समजून घेतल्यावर, ज्या विषयांचा सराव कमी असेल त्या विषयांना तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुमचे भाषेवर चांगले प्रभुत्व असेल तर तुम्ही इतर विषयांसाठी अधिक वेळ देऊ शकता.
प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर द्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका कोणत्याही परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरतात, त्यामुळे जर तुम्ही शेवटच्या वर्षाची परीक्षा सोडवली तर तुम्हाला पास होण्यासाठी खूप मदत होईल.