साक्षीदार | १२ ऑक्टोबर २०२३ | देशात गेल्या काही वर्षापासून पेट्रोल व डीझेलच्या दरात नियमित वाढ होत असल्याने जनतेला याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. सध्या इस्राइल-हमास युद्धाचा फटका मागच्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलवर दिसून आला आहे. परंतु, आज कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
नवी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत, मात्र चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १४ पैशांनी १०२.७७ रुपये तर डिझेल १३ पैशांनी ९४.३७ रुपये प्रतिलिटरने महागले आहे. इस्राइल-हमास युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली होती परंतु, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. आज WTI कच्च्या तेलाच्या किंमतीत 0.52 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे आणि ते प्रति बॅरल $ 83.06 च्या जवळपास व्यवहार करत आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत 0.40 टक्क्यांची घट दिसून आली आहे आणि ते प्रति बॅरल $ 85.48 वर आहे.
मुंबईत पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे. आज मुंबईत डिझेलच्या दरात किचित वाढ झाली आहे.
पुण्यात पेट्रोल १०६.०५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.५६ रुपयांनी विकलं जातंय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किचिंत घट झाली आहे. ठाण्यात पेट्रोलचा आजचा भाव १०६.३८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४. ३४ रुपयांनी विकलं जाईल. पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये काही पैशांनी आज वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.५९ रुपये मोजावे लागतील.