पंतप्रधान मोदी बनले पायलट : ‘तेजस’मधून केला प्रवास !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २५ नोव्हेबर २०२३ | कर्नाटकमधील बंगळूर येथील येलहंका एयरबेसमधून त्यांनी तेजसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फायटर प्लेन ‘तेजस’मधून भरारी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज बंगळुरु येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) दौऱ्या दरम्यान लढाऊ विमान ‘तेजस’मधून उड्डाण केले. त्याबद्दल पंतप्रधानांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी म्हणाले कि, आज मी मोठ्या अभिमानाने सांगू शकतो की आम्ही आमच्या मेहनतीने आम्ही आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात जगात कोणापेक्षाही कमी नाही. भारतीय हवाईदल, DRDO आणि HAL सह संपूर्ण देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.” पंतप्रधान आज बंगळुरु दौऱ्यावर आहेत. येथे पंतप्रधान एचएएलच्या कामाची पाहाणी करणार आहेत.

तेजस जेट विमानामधील सुविधांचाही ते आढावा घेत आहेत. एचएएल दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एचएएलच्या निर्मिती प्रक्रियांचीही माहिती घेतली. भारतीय हवाई दलाने नुकतेच 12 आधुनिक Su-30MKI लढाऊ विमान खरेदीसाठी सरकारी कंपनी ‘एचएएल’ला एक टेंडर जारी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तेजसमधून उड्डाण केले तेव्हा ते पूर्णपणे लढाऊ विमान वैमानिकाच्या वेशात पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने संरक्षणाची क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या योजना आणल्या आहेत. त्यामध्ये स्वदेशी ही महत्त्वाची योजना आहे. तेजस विमान देखील या योजनेचा भाग आहे. या मालिकेतील पहिले विमान 2016 मध्ये भारतीय हवाई दलात सामील करण्यात आले होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS