साक्षीदार | २६ ऑक्टोबर २०२३ | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यातील शिर्डीच्या दौऱ्यावर आले असून मोदींचा हा दौरा शिर्डीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधानांनी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निळवडे धरणाचं लोकार्पण केलं. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
तर दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा बांधवांच्या या आक्रमक भूमिकेचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यालाही बसल्याचे पाहायला मिळाले. अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या एसटी बसेस फोडल्याची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीमध्ये आले असून विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जाण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसचे नियोजन करण्यात आले. मात्र सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्याने अनेक गावात पुढार्यांना बंदी करण्यात आली आहे. शिर्डी येथील सभेसाठी लोकांना घेवून जाण्यासाठी मंगरुळ येथे गेलेल्या एसटी बस (क्र. एमएच. 14, बीटी 2158)च्या अज्ञातांनी काचा फोडल्या. यामुळे ही बस चालक पी. पी. फुंदे यांनी पुन्हा शेवगाव आगारात पुन्हा आणली