इंडियाचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान मोदी पोहचले ड्रेसिंग रूममध्ये !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २० नोव्हेबर २०२३ | नुकतेच अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर भारताची फलंदाजी निराशाजनक झाली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना चांगल्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत रूपांतर करता आलं नाही. त्यामुळे भारताला ५० षटकांमध्ये केवळ २४० धावाच करता आल्या. तर ट्रॅव्हिस हेडने ठोकलेल्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना सहा विकेट्सने सहज जिंकून सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान, अंतिम सामन्यातील अनपेक्षित पराभवानंतर नरेंद्र मोदींनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जात खेळाडूंची भेट घेतली. तसेच त्यांना धीर दिला. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने सोशल मीडियावर पोस्ट करत नरेंद्र मोदींनी भारतीय संघाला दिलेल्या भेटीची माहिती दिली. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये जडेजा म्हणाला की, आम्ही या स्पर्धेत चांगला खेल केला. पण विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. या पराभवामुळे अनेकांची हृदय दुखावली गेली. पण आमच्या चाहत्यांकडून मिळणारा पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास बळ देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ड्रेसिंग रूममध्ये येत दिलेली भेट खास आणि प्रेरणादायी होती.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS