back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Raver Bus Accident ; खाजगी बसचा अग्नीतांडव : सुदैवाने २० प्रवासी सुरक्षित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | देशभर दिवाळीचा उत्साह सुरु असून अनेक मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे दिवाळीसाठी आलेले आता पुन्हा शहराकडे जात असल्याने रेल्वेस्थानकासह बस स्थानक व खाजगी बसेसमध्ये मोठी गर्दी होवू लागली असतांना अचानक रावेरहून पुण्याकडे जाणाऱ्या साई सिद्धी ट्रॅव्हल्सच्या बसने अचानक पेट घेतला. त्यात बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने त्यातील २० प्रवासी सुरक्षित आहेत. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना रावेर-सावदा रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

दरम्यान, आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील प्रवाशांनी खाली उड्या मारल्या तर व काही जणांनी आपल्याकडील सामान फेकून दिले. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी डिकीतील प्रवाशांचा सामान जळून खाक झाला. रावेर पुणे ही लक्झरी बस (क्र. एमएच ४० एन ५३६१) २० प्रवासी घेऊन शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रावेर येथून निघाली. दरम्यान, ही बस वडगाव ते वाघोदादरम्यानच्या सुकी नदीच्या पुलाजवळून जात असताना बसचे मागील टायर फुटले आणि बसने अचानक पेट घेतला.

आगीचा प्रकार लक्षात येताच चालकाने बस बाजूला थांबवून वाहकाच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी खिडक्या व संकटकालीन मार्गातून उड्या मारून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, रस्त्यावरील काही वाहनचालकांनी मदतीचा हात दिला. सावदा नपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. ब्रेकचे लायनर जाम होऊन अकस्मात आग लागल्याची माहिती मिळाली.

Raver Bus Accident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS