back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

Tribal society ; आदिवासी समाज बांधवांच्या ज्वलंत मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – धनगर समाजाला आदिवासी एस टी अनुसुचित जमातीच्या आरक्षण न देणे व जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासींचे एसटी अनुसुचित जमातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी दिनांक १८ ऑक्टोबर बुधवार रोजी फैजपुर येथील प्रांत अधिकारी कार्यावर आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने भव्य आदिवासी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असुन आपल्या न्याय हक्काच्या संघर्षासाठी या मोर्चात चोपडा ,रावेर , यावल सहा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठया संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष एम बी तडवी यांनी केले आहे .

- Advertisement -

याबाबत आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्रच्या वतीने काढण्यात आलेल्या आवाहन पत्रकात संघटनेने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये म्हटले आहे की , धनगर समाजाला एसटी चे आरक्षण देण्यात येवु नये , जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासी एसटी जातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावेत , रावेर , यावल . चोपडा तालुक्यातील कायम रहिवासी करीत असलेल्यासाठी आदिवासींचे ग्रामपंचायत दप्तरी नमुना क्रमांक८ला नांवे दाखल करण्यात यावीत , पेसा कायदा अधिक सक्त करण्यात यावा , फैजपुर येथे एक हजार विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी आदिवासी वस्तीगृह सुरू करण्यात यावे याशिवाय तिडया, अंधारमंळी मोहमांडली या अतिदुर्गम क्षेत्रात रस्ते तयार करण्यात यावेत अशा विविध ज्वलंत प्रश्नांना घेवुन आदिवासी तडवी भिल्ल एक्तता मंचच्या वतीने दिनांक १८ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ९ वाजेपासुन फैजपुर साखर कारखाना ते फैजपुर प्रांत आधिकारी कार्यालया पर्यंत हा पायी मोर्चा काढण्यात येणार असुन , या मोर्चात आदिवासी बांधवांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राज्यअध्यक्ष एम बी तडवी व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे .

Tribal society

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS