अखिल भारतीय मराठा महासंघाचं गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

धरणगाव (सुनील भोळे) ; – जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिलीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वात हा पाठिंबा देण्यात आला आहे.

- Advertisement -

महासंघाचा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सामाजिक एकता आणि विकासाचे उद्दिष्ट ठेवून, गुलाबराव पाटील यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. महासंघाने आपल्या सदस्यांना, मतदारसंघातील सर्व मराठा बांधवांना, तसेच समाजातील इतर घटकांनाही गुलाबराव पाटील यांच्या बाजूने समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.गुलाबराव पाटील हे आपल्या भागातील जनतेच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे खानदेश मुलुख मैदान तोफ माहितीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

यावेळी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉक्टर बीबी भोसले जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील व सदस्य उपस्थित होते. युवा नेतृत्व तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतापराव पाटील यांनी त्यांचे स्वागत करून ऋण व्यक्त केले आहे.

- Advertisement -

यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी .बी. भोसले, जिल्हाउपाध्यक्ष विश्वास पाटील, जितेंद्र पाटील, किशोर राघो पाटील, दोनगाव सरपंच भागवत पाटील, नाटेश्र्वर पवार, अमोल पाटील, यांच्यासह अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS