Sardar College ; महाविद्यालयात सरदार नियतकालिक अंकाचे प्रकाशन संपन्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

ऐनपूर ; – सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे सरदार नियतकालिक अंकाचे शैक्षणिक वर्ष २०२२- २३ चे नियतकालिक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . नियतकालिकाचे प्रकाशन ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा. श्री रामदास नारायण महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये उत्कृष्ट नियतकालिक तयार करण्याचे श्रेय संपादक मंडळ आणि विद्यार्थी यांचे आहे असे सांगितले.सुंदर, सुबक , रेखीव व आकर्षक असे नियतकालिक तयार झाले आहे.

- Advertisement -

महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. जे. बी. अंजने यांनी या नियतकालिकामध्ये जे काही आपण वर्षभर कार्यक्रम घेत असतो त्या कार्यक्रमाचा संपूर्ण आढावा या नियतकालिकामध्ये आहे. सर्व समावेशक नियतकालिक तयार करण्याचे श्रेय संपादक मंडळाचे आहे.नियतकालिक म्हणजे महाविद्यालयाचा आरसा होय.नियतकालिकामध्ये विद्यार्थ्यांचे काही लेख, कविता, निबंध, चारोळ्या व गुर्जर भाषेचे साहित्य प्रकाशित करण्यात आले आहे. नियतकालिक च्या माध्यमातून विद्यांर्थ्यांमधील लेखन या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करीत असते असे त्यांच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. साईनाथ पी. उमरीवाड यांनी केले. आजच्या कार्यक्रमाला नियतकालिक संपादक मंडळ, सर्व विभागाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.विनोद रामटेके यांनी केले व अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या प्रकाशन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Sardar College

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS