तुम्ही अमेझॉनवरन काही शोधताय का ?
यावर कराल क्लिक
Husband Heinous Act Wife साक्षीदार न्युज । 5 एप्रिल 2025। पुण्यातील नवी सांगवी परिसरात एका पतीने आपल्या पत्नीवर केलेल्या अघोरी कृत्याने सर्वांना धक्का बसला आहे. पत्नीने पोटगीसाठी कोर्टात दावा दाखल केल्याचा राग मनात ठेवून पतीने तिच्या गळ्याला कोयता लावत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केले. यानंतर, हळदी-कुंकू लावलेल्या लिंबाच्या फोडी तिच्या गुप्तांगात पिळण्याचा घृणास्पद प्रकार घडला. ही घटना पिंपळे निलख येथे सुमारे वर्षभरापूर्वी घडली असून, 36 वर्षीय पीडित महिलेने 11 एप्रिल 2025 रोजी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
काय आहे प्रकरण ?
पीडित महिला आणि आरोपी पती यांचा 2004 मध्ये विवाह झाला असून, त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. या त्रासाला कंटाळून महिला मुलांसह बालेवाडीत राहायला गेली, तर पती पिंपळे निलख येथे वेगळा राहू लागला.
घटना घडली तेव्हा महिला मुलांच्या शाळेचे साहित्य आणण्यासाठी पतीच्या घरी गेली होती. तिची आई, मामी आणि मुले सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबले होते. पतीच्या फ्लॅटमध्ये गेल्यावर, मद्यधुंद अवस्थेतील पतीने तिला शिवीगाळ केली. तिने प्रत्युत्तर न दिल्याने चिडलेल्या पतीने कोयता काढून तिच्या गळ्याला लावला. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि हळदी-कुंकवाच्या लिंबाच्या फोडी तिच्या गुप्तांगात पिळल्या. “मी तुझ्यावर जादूटोणा केला आहे, तू वेडी होशील. हा प्रकार कोणाला सांगितलास तर तुझा खून करेन,” अशी धमकी त्याने दिली.
घटनेनंतर घाबरलेली महिला कोणालाही काही न सांगता घरी परतली. काही दिवसांनी तिने आपल्या आई आणि मामीला हा प्रकार सांगितला, ज्यामुळे तक्रार दाखल झाली. सांगवी पोलिसांनी तपास सुरू केला असून, या प्रकरणाने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का! हा नेता आज भाजपात करणार प्रवेश
गिरीश महाजन यांचा पलटवार, एकनाथ खडसे आणि अनिल थत्तेंना अब्रूनुकसानीची नोटीस
आईनेच स्वत:च्याच मुलीचा अश्लील व्हिडिओ काढून प्रियकराला पाठवला
शिक्षण विभागात 570 बोगस शिक्षकांचा पर्दाफाश, 200 कोटींचा घोटाळा
ईव्हीएम हॅकिंगचा दावा: तुलसी गब्बार्ड यांच्या खुलाशाने निवडणूक प्रणालीवर प्रश्नचिन्हसासूला पळवून नेणाऱ्या