ग्रामीण भाग,कृषी तसेच नावीन्यपूर्ण बाबींचा अभ्यास करणार
यावल ( साक्षीदार न्युज ) ; – येथे पुणे निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी,गुरुकुल या १२ तास चालणाऱ्या शाळेतील इयत्ता ७ वी व ८ वीच्या ४५ विद्यार्थी व ३ शिक्षक मातृभूमी परिचय शिबिर यासाठी आले आहेत. डोंगर कठोरा तालुका यावल येथील अ.ध.चौधरी विद्यालयामध्ये हे विद्यार्थी १९ ते २६ दरम्यान निवासी आसणार आहेत. या शिबिराच्या निमित्ताने हे सगळे विद्यार्थी स्थानिक संस्कृती, परंपरा, खाद्य संस्कृती, शेतीची वैशिष्ट्ये, सातपुडा पर्वत रांगेची ओळख करुन घेत आहेत.सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भगवद्गीतेच्या १५ व्या अध्याय पठणाने व शारीरिक कसरतींच्या प्रात्यक्षिकाने शिबिराचे उद्घाटन झाले.
या शिबिरात विद्यार्थ्यांनी कापसाची लागवड कशी केली जाते,हे कापसाची प्रत्यक्ष शेतात वेचणी करुन समजून घेतले,त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात केळीची लागवड कशी केली जाते, त्याचा व्यापार कसा होतो.केळीची बागेची लागवड आधुनिक व पारंपरिक पद्धत याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.सातपुडा पर्वत रांगेचे पौराणिक महत्त्व श्री क्षेत्र डोंगरदे येथील भेटीत विद्यार्थ्यांनी मठाच्या स्वरूपानंद महाराजांकडून समजून घेतले. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली डोंगरदे येथील आदिवासी समाजाच्या वस्तीवर विद्यार्थ्यांनी रहीवाश्यांशी संवाद साधला,प्रत्येक घरात मुलांनी पुण्याहून आणलेला खाऊ भेट म्हणून दिला. पारंपरिक आदिवासी तालावर विद्यार्थ्यांनी त्यांचे पारंपरिक बर्ची नृत्य सादर केले.तसेच विद्यार्थ्यांनी गावाजवळील अरिहंत जिनिंग व प्रेसिंग मिलमध्ये भेट देऊन माहिती घेतली. तसेच मिलके चलो असोसिएशन अमळनेर तर्फे अनिरुद्ध पाटील व सिद्धार्थ पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या विविध संकल्पना प्रात्यक्षिकतुन समजून सांगितल्या, यामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभाग घेतला.तसेच श्री क्षेत्र मनुदेवी येथे भेट दिली.
यासोबत विद्यार्थी गावामध्ये रोज सकाळी प्रभात फेरी काढत आहेत, संध्याकाळच्या भजनात नियमित सहभागी होत आहेत.
या शिबिराच्या पूर्ण आयोजनात मूळ डोंगर कठोराचे व सध्या पुण्याला स्थायिक डॉ.पराग पाटील,अमोल जावळे,डॉ.राजेंद्रकुमार झांबरे,सरपंच नवाज तडवी,मुख्याध्यापक नितीन झांबरे,उपसरपंच योगेश पाटील, पी.डी.भिरुड,माजी सरपंच मनोहर महाजन,रुपेश पाटील,सागर झोपे,चंद्रकांत भिरुड,केवल राणे, धनंजय पाटील व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
Pune Matribhoomi Introduction Camp