Pune Suicide ; आज पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली यात भाजपच्या (BJP) एका नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्या नेत्याने केली आत्महत्या ?
भाजपच्या आत्महत्या केलेल्या नेत्याचं नाव सुनील धुमाळ (वय ४५) असं आहे . पुणे येथे वास्तव्यात असणारे धुमाळ (Pune News) यांच्यावर भाजप युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी होती आणि ती ते पार पडत होते . मंगळवारी सकाळच्या सुमारास हडपसर भागातील साडेसतरानळी येथील रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला . त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.
का केली धुमाळ यांनी आत्महत्या ?
सुनील धुमाळ यांनी का केली याचे कारण अध्याप देखील स्पष्ट झालेले नाही . त्यांच्या मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट देखील आढळून आलेली नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली हे सांगणे कठीण आहे . या घटनेचा रेल्वे पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
धुमाळ हे भाजपमध्ये सक्रीय होते .
सुनील धुमाळ यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केल्याने सुनील धुमाळ यांच्यावर भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश संपर्क प्रमुख म्हणून कामगिरी सोपविण्यात आली होती . आणि ते भाजपमध्ये सक्रिय होते. त्यांच्या पाठीमागे त्यांची आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.