Education News | पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप; अभ्यास व ध्येयपूर्तीचे आवाहन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Education News भडगाव | गोरख माळी | पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. स्वागतगीत कु. लावण्या महाजन हिने सादर केले.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अजय अहिरे होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस निरीक्षक महेश शर्मा, कवी प्रा. खुशाल कांबळे उपस्थित होते. यांच्यासह उपमुख्याध्यापिका छाया बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, अशोक तायडे व उपप्राचार्य संदीप सोनवणे यांची व्यासपीठावर उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. शरद पाटील यांनी करून दिला, तर प्रास्ताविक संदीप सोनवणे यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियान, सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा, शिक्षासूची व विविध सूचनांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि परंपरा यावरही प्रकाश टाकण्यात आला.
मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून योग्य दिशेने वाटचाल करावी, असा सल्ला दिला. प्रा. खुशाल कांबळे यांनी “आरोग्य हीच खरी संपत्ती” असल्याचे प्रतिपादन केले.

- Advertisement -

शिक्षक मनोगतातून प्रा. रेखा कोसोदे यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत शालेय आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य अजय अहिरे यांनी विद्यार्थ्यांना आगामी काळात मनापासून अभ्यास करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक नितीन सोनजे तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख किरण पाटील यांचीही उपस्थिती होती. सूत्रसंचलन प्रा. सुयोग झंवर यांनी केले, तर आभार प्रा. सुनिल पाटील यांनी मानले.

उमेदवार,महिला,कार्यकर्ते यांयाच्यावर पोलिसांचा जोरदार लाठीमार

मतदान केंद्रावर पोलिस आणि उमेदवारासह कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राढा 

जळगांव मतदान केंद्रावर मतदाराचे ब्रेन वॉश ?

Education News

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS